
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्टयन स्थळांवर आतापासूनच गर्दी होताना दिसत आहे. उत्तरप्रदेशच्या वाराणसीमध्येदेखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. उत्तरप्रदेश हे पर्यटनाच्या दृष्टीने मोठे केंद्र बनले आहे. मागील काही वर्षांपासून दक्षिण भारताने देशांतर्गत पर्यटनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नववर्षानिमित्त वाराणसीत येणार्या पर्यटक आणि भाविकांची संख्या 10 लाखांहून अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या वाराणसीतील बहुतांश हॉटेल्स, बोटी आणि क्रूझचे बुकिंग पूर्ण झाले आहे. पर्यटकांच्या सुविधा लक्षात घेऊन पर्यटन विभागानेही विशेष व्यवस्था केली आहे.