Test-2

विवेक मराठी    16-Jan-2024
Total Views |

img ठाकरे गटाचे कोकणातील आमदार राजन साळवी यांच्या घरी आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी धाड टाकली. राजन साळवी यांच्या चार मालमत्तांच्या ठिकाणी शोधकार्य सुरू आहे. राजन साळवी यांचं घर, त्यांचं जुनं घर, त्यांच्या भावाचं घर आणि त्यांच्या हॉटेलमध्ये धाडसत्र सुरू असल्याची माहिती राजन साळवींनी दिली. दरम्यान, त्यांच्याकडे ११८ टक्क्यांनी जास्त बेकायदेशीर मालमत्ता सापडल्याने ही चौकशी सुरू असल्याचं समोर आलं आहे. यासर्व प्रकरणात त्यांना उद्धव ठाकरे यांनीही फोन करून दिलासा दिला आहे. याबाबत त्यांनी माध्यमांना माहिती दिली.

राजन साळवी म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मला तातडीने फोन केला. त्यांनी विचारपूस केली. म्हणाले राजन तुझ्या पाठिशी संपूर्ण महाराष्ट्र आहे. याचा मला अभिमान आहे.