अन् खुशबूचे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण

30 Dec 2023 12:23:03
येथील रहिवासी व सध्या पुण्यात यूपीएससीची तयारी करणार्‍या खुशबू महेश मसराम हिचा रविवार 24 डिसेंबर रोजी अल्पशः आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला. खुशबू ने सन 2011 मध्ये 10 वीच्या परीक्षेत 98 टक्के गुण घेऊन गोंदिया जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावले होते. ती पुण्यात राहून यूपीएससी परीक्षेची तयारी करत होती. तिला यश देखील मिळाले होते. तिने दोन प्री परीक्षा तसेच एक मेन्स परीक्षा उत्तीर्ण केली.
Powered By Sangraha 9.0