मुंबई : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी आपल्या करिअरमधील कदाचित शेवटच्या चित्रपटाचा संकेत दिला आहे. 'महाभारत' हे भव्य दिव्य सिनेमा त्यांचं अंतिम आणि सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असू शकतं, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. “माझं स्वप्न आहे की मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहावं…,” असं ते म्हणाले.
‘सितारे जमीन पर’ फेम अभिनेता राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये बोलत होता. या संवादात त्यांनी 'महाभारत' या महाकाव्याचं महत्त्व, त्याचा दर्जा, त्यातील भावना आणि भव्यता यावर भर दिला. “या कथेत जे काही आहे, ते जगात सापडतं. भावना, स्तर, संघर्ष, तत्वज्ञान, सगळं काही आहे 'महाभारत' मध्ये,” असं ते म्हणाले.
आमिरने ही इच्छा व्यक्त केली की, “माझा शेवट माझ्या शूज घालूनच व्हावा – म्हणजे काम करत असताना. पण जर विचारलंत, तर माझ्या डोक्यात याच एका गोष्टीचा विचार येतो. कदाचित 'महाभारत' केल्यावर असं वाटेल की आता काही शिल्लकच नाही.”
या आधी The Hollywood Reporter ला दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी 'महाभारत' या चित्रपटावर आपली दीर्घकालीन योजना मांडली होती. “हे माझं सर्वात मोठं स्वप्न आहे. कोणत्या भूमिकेसाठी कोण कलाकार योग्य ठरेल, ते पाहावं लागेल,” असं त्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले होते की, “'महाभारत' एकाच चित्रपटात सांगणं शक्य नाही. त्यामुळे हे अनेक चित्रपटांच्या स्वरूपात असेल. हे मोठ्या प्रमाणात, खूप मोठ्या स्केलवर साकारावं लागेल.” या भव्यतेच्या मागे असलेल्या मेहनतीचा उल्लेख करत ते म्हणाले की, “यासाठी कदाचित एकापेक्षा अधिक दिग्दर्शक लागतील. वेळेच्या मर्यादेत पूर्ण करायचं असेल, तर टीम मोठी लागेल.”
दरम्यान, आमिर सध्या आपला आगामी क्रीडाविषयक चित्रपट ‘सितारे जमीन पर’ साठी सज्ज होत आहे, जो २० जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, तो रजनीकांत यांच्या ‘कुली’ या चित्रपटात देखील झळकणार असून हा चित्रपट लोकेश कनगराज दिग्दर्शित करत आहेत.
आमिरने ‘लाहोर १९४७’ या कालपटाचे निर्मितीही स्वीकारली आहे, ज्याचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी करत असून यात सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.