बिहारमध्ये कलश यात्रेदरम्यान धर्मांध मुस्लिमांच्या जमावाचा गोंधळ! [updated 2]

Cat ID: 13586

Word Count: 182

    07-May-2026
Total Views |

bihar kalash
 
 
मुंबई : (Kalash Yatra) बिहारच्या मोतिहारी येथे विष्णू महायज्ञाच्या कलश यात्रेदरम्यान मशिदीजवळ धर्मांध मुस्लिमांच्या जमावाने मोठा गोंधळ घातल्याची घटना घडली. भाविकांना घाबरवण्यासाठी काही जण लाठ्या-काठ्या घेऊन रस्त्यावर उतरल्याचे निदर्शनास आले.
 
पचपकडी परिसरात कलश यात्रा शांततेत सुरू असताना भाविक वाजत-गाजत यात्रेतून मार्गस्थ होत होते. यात्रा मशिदीजवळ पोहोचताच काही धर्मांध मुस्लिमांनी गाण्यावर आक्षेप घेतला. सुरुवातीला वादावादी झाली; मात्र काही वेळातच लाठी-काठ्या घेऊन मोठा जमाव तेथे जमल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. हिंदू भाविकांना धमकावण्यात आल्याचा आरोप सध्या होतोय.
परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच जिल्ह्यातील वरिष्ठ पोसील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी स्वतः परिस्थितीचा ताबा घेतला. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. प्रशासनाने तत्काळ स्पीकर बंद करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर कलश यात्रा नियोजित मार्गाने पुढे रवाना करण्यात आली. (Kalash Yatra)
 
हेही वाचा : बहुमत सिद्ध करा मगच मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी! जोसेफ विजय यांचा शपथविधी लांबणीवर
पोलीस प्रशासनाने या प्रकरणात कठोर भूमिका घेतली असून संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मशिदीजवळ गोंधळ घालणाऱ्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, वातावरण बिघडवणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे हिंदू संघटनांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Kalash Yatra)