दोन दिवस रेकी केली, टार्गेटवर गोळी झाडली... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या-कोल्ड ब्लडेड मर्डर?

    07-May-2026
Total Views |

shootout
 
कोलकाता : (West Bengal Violence 2026) भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ (४२) यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. बुधवार, दि. ६ मे रोजी रात्री १०.३० वाजता हा प्रकार घडला. पश्चिम बंगालमध्ये सत्तापालटानंतरही हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. कोलकात्याहून मध्यमग्राम स्थित आपल्या घरी खासगी वाहनातून परतत असताना त्यांच्यावर हा गोळीबार झाला. ते चालकाच्या बाजूच्या सीटवर बसले होते. त्यांच्यासोबत चालक आणखी एक कार्यकर्ताही होता. कोलकात्यापासून सुमारे वीस किमी दूर मध्यमग्राम येथे त्यांच्या मागे एक कार आली. त्या कारने चंद्रनाथ यांच्या वाहनाचा रस्ता रोखला.
 
त्यानंतर एका दुचाकीवरुन हल्लेखोर उतरला. ज्यात चंद्रनाथ यांच्या वाहनावर १० राऊड फायर केल्या. ज्यातील चार गोळ्या रंगनाथ यांना लागल्या होत्या. त्यातील दोन गोळ्या छातीतून आरपार गेल्या. एक गोळी पोटात लागली. चालक बुद्धदेव बेरा यांनाही गोळी लागली. हल्लेखोर कार सोडून वाहन क्रमांक नसलेल्या दुचाकीने फरार झाले. जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, चंद्रनाथ यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. चालक गंभीर आहे. भाजपने या प्रकरणात तृणमुल काँग्रेसवर आरोप लावला आहे.(West Bengal Violence 2026)
 
घटनेचे सीसीटीव्ही फूटेजही दिसत आहे. ज्यात ग्लॉक ४७ एक्स पिस्तुल आणि विना क्रमांक असलेली दुचाकी दिसत आहे. फॉरेन्सिक तपासात आढळलेली ग्लॉक ४७ एक्स पिस्तुल काही सामान्य गुन्हेगार वापरत नाहीत. हा हल्ला एकंदरीत सऱ्हाईत हल्लेखोर आणि प्रशिक्षित नेमबाजांनी केला असल्याचा संशय पोलीसांना आहे.
 
दुचाकीचा वाहन क्रमांक हटविण्यात आला होता. गुन्हेगारांनी वापरलेली चारचाकीचा वाहन क्रमांक हा बनवाट निघाला. त्यांनी हेल्मेट घातले असल्याने ओळख पटवणेही कठीण होत आहे. चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार झाल्याच्या एका तासात भाजपचे कार्यकर्ता रोहित रॉय यांच्यावर मध्यरात्री १२.३० वाजता गोळीबार झाला. त्यांची प्रकृतीही गंभीर आहे. ४ मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर एकूण पाच जणांची हत्या झाली आहे. ज्यात तीन जण भाजपचे तर दोन जण तृणमुल काँग्रेसशी निगडीत आहेत.(West
 
Bengal Violence 2026)
सुवेंदु अधिकारी यांचा जीव धोक्यात!
ज्या प्रकारे सुवेंदु अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाची हत्या झाली आहे, त्यावरुन लक्षात येते की प.बंगालमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. खुद्द सुवेंदु यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या स्वीय सहायकाची हत्या हा नियोजित कट असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. भाजप प.बंगालमध्ये अशा गुंडांचा सफाया लवकरच करेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.